चिमूर प्रतिनिधी :-
केंद्र सरकारनं 15 नोव्हेंबर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधील कार्यक्रमात या हफ्त्याचे वितरण करण्यात आले. मात्र, ज्या शेतकऱ्यांचा PM किसान योजनेचा 15 वा हप्ता जमा झाला नसेल त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय शेतकरी बांधवांनी त्यांच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच शेतकरी बांधव पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 वर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार देखील करू शकता.
अशा प्रकारे तक्रार दाखल करु शकता
● सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान वेबसाइटवर जाऊन लॉग इन करावे लागेल.
● आता "रजिस्टर कंप्लेंट" पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमची तक्रार लिहा.
● तुमच्या तक्रारीसोबत तुमच्या कागदपत्रांच्या प्रती जोडा
● तुमच्या तक्रारीत तुमचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक समाविष्ट करा.
शेवटी शेतकरी बांधवांनी सबमिट बटणावर क्लिक करावे.
पैसे न येण्याची अनेक कारणे
तुमच्या खात्यात पैसे न येण्याची अनेक कारणे असू शकतात. एक कारण म्हणजे तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही. ई-केवायसी नसल्याचीही शक्यता आहे. याशिवाय, असे देखील होऊ शकते की आपण अजिबात अर्ज केला नाही. जर तुम्ही ही सर्व आवश्यक कामे पूर्ण केली असतील तर तुमची तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला लवकरच पैसे मिळतील.